एस एस पी शिक्षण संस्थेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रमा चे आयोजन ‘
पिंपरी,दि.१३:- एस. एस. पी ग्रुप ऑफ इंस्टीट्यूटच्या गणेश इंटरनॅशनल स्कूल आणि सीनियर सेकंडरी ,चिखली या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा गायकवाड यांनी सरस्वती माता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन कार्य विद्यार्थ्यांनी इंग्रजी व हिंदी भाषेत सर्वांसमोर सादर केले.
शाळेच्या पर्यवेक्षिका माधुरी येवले यांनी भारताचे संविधान व त्यांचे रक्षण करण्याची शपथ घेतली. शाळेतील इतर शिक्षकांनीसुद्धा बाबासाहेबांचे बालपण, शिक्षण ते समाजकार्य, भारतीय राज्यघटना याविषयी विशेष माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली पोतदार यांनी केले.
कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन एस बी पाटील, संस्थेचे विश्वस्त गणेश पाटील , प्रशासकीय अधिकारी प्रकाश गायकवाड, सहयोगी संचालक सुनील शेवाळे , शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा गायकवाड, प्ले स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती गडद पर्यवेक्षिका पद्मश्री पगार, पर्यवेक्षिका माधुरी येवले यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed