पुणे, दि.१५:- मुख्य मध्यस्थी केंद्र, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अशोका हॉल’ जिल्हा न्यायालय, पुणे येथे मध्यस्थी जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश -१ के. पी. नांदेडकर होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश-२ एस. जी. वेदपाठक, पुणे वकील संघाचे अध्यक्ष ॲड. केतन तुषार आदी उपस्थित होते.

न्यायाधीश नांदेडकर यांनी ‘मध्यस्थी प्रक्रियेचे फायदे’ या विषयी मार्गदर्शन केले. जिल्हा न्यायाधीश वेदपाठक यांनी मध्यस्थी म्हणजे काय, मध्यस्थी प्रकियेचा इतिहास, मध्यस्थी प्रक्रियेची पार्श्वभूमी सांगितली. आजच्या गतिमान युगात वेळ व पैशाची बचत व्हावी या उदिष्टाने मध्यस्थी प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.

ॲड. केतन तुषार यांनी मध्यस्थी प्रक्रिमध्ये ‘विधिज्ञाची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मध्यस्थी वकील ॲड. मिलींद पवार, ॲड. एस.डी. रत्नपारखी, ॲड. जयश्री वाकचौरे, ॲड. सुजाता गुंजाळ यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी मध्यस्थी विधिज्ञ, पॅनल विधिज्ञ, विधी स्वयसेवक, पक्षकार व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!