पुणे,दि.१७:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधी महाविद्यालयात डॉ.रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी माजी जिल्हा न्यायाधीश आदरणीय दिलीप देशमुख साहेब यांना आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांनी केले.विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजाचे स्वरूप लक्षात यावे तसेच ड्राफ्टिंग कसे असावे,याविषयी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत एकूण नऊ संघाने सहभाग नोंदविला अहमदनगर,सांगली,पुणे,बारामती, लोहगाव, पुणे शहर इत्यादी भागातील महाविद्यालयातील स्पर्धकांनी उपस्थिती दर्शवली. प्रास्ताविकानंतर प्रत्येक संघाने आपले Memorials सादर केले. या स्पर्धेतून दोन संघ निवडण्यात आल्या यात न्यू लॉ कॉलेज अहमदनगर सर्वोत्कृष्ट संघ म्हणून यांना प्रशस्तीपत्रक,सन्मानचिन्ह, आणि 5000 रुपये रोख बक्षीस देण्यात आले. तसेच उत्कृष्ट संघ विधी महाविद्यालय हडपसर पुणे यांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह,3000 रुपये रोख पारितोषिक देण्यात आले त्याचबरोबर उत्कृष्ट संशोधक म्हणून प्रिया खोडवे लॉ कॉलेज बारामती तर उत्कृष्ट पिटीशनर म्हणून संघर्ष बोराडे, शिवाजी मराठा लॉ कॉलेज पुणे यांना सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या व प्राचार्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रंजना पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.या स्पर्धेचे नियोजन महाविद्यालयातील प्रा. मयूर कोळेकर,प्रा.सीमा वावरे, प्रा किरण जाधव,प्रा. सोनबर काझी, प्रा.जितेंद्र मस्के, प्रा.संतोष सुतार यांनी केले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मयूर कोळेकर यांनी केले या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थी प्रतिनिधी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!