नवी सांगवी ,दि.१७:– डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त महात्मा फुले भाजी मार्केट,साई चौक,नवी सांगवी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
त्याप्रसंगी अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशासाठी संविधान लिहून त्यांनी खूप मोठे मोलाचे योगदान दिले आहे.त्या संविधानामुळे आज भारतातील सामान्य नागरिकांपासून तर भारतातील सर्वोच्च पद मानले जाणारे राष्ट्रपती पर्यंत सर्वांना अधिकार प्राप्त झाले आहेत.
या जयंती प्रसंगी प्रतिमेस पुष्पहार सिनेतारिका सुवर्णा चोथे व निशा कडकधोंड यांनी अर्पण केला तर रवि खोकर,कुणाल धिवार,रमेश डफळ,सुनिल सावंत,नितीन धोधाड,रमेश चौधरी,श्रीराम परतले,सचिन कांबळे,योगेश पैठणे,सौरभ इसवे,निलेश बडगुजर,विष्णू खेडेकर,बळीराम बिरादार,महादेव फुलगमे,विपुल शिंदे,अंकुश आपेट,नायडू आण्णा,भरत प्रसाद,अरुण जाधव,गणेश मते,नरसिंग यादव,गणेश पैठणे,सयाजी आगलावे आदी मान्यवर, मार्केट मधील सदस्य व नागरिक उपस्थित होते.
Comments are closed