पुणे,दि.१९ :- पुणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंग विना परवाना बोर्ड, बँनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किऑक्स यांचेवर दि. १९ रोजी परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत माधव जगताप, उप आयुक्त, परवाना व आकाशचिन्ह विभाग यांचे नियंत्रणाखाली कारवाई करण्यात आली.
यामध्ये १५ क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये विविध ठिकाणी निष्कासन कारवाई करणेत आली. सदर कारवाई मध्ये ५ क्रेन, ४० बिगारी सेवक, ०६ गँस कटर, ५ वेल्डर, या यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करण्यात आला तसेच ज्यांनी विना परवाना जाहिरात होर्डिंग आणि बोर्ड लावले आहेत त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
तसेच यापुढे अनधिकृत होर्डिंग, विना परवाना बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किऑक्स इ. यावर परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून निष्कासन कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. आज दि. १९ रोजी करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे
Comments are closed