पुणे,दि.२१:-  2022-23 या वर्षामध्ये पुणे महापालिकेने केलेल्या विविध उल्लेखनीय कामामुळे पुणे महानगरपालिकेला आज 20 एप्रिल रोजी नगरविकास दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे शुभहस्ते गौरविण्यात आले.
नागरी स्थानिक संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी माहे ऑगस्ट 2022 मध्ये मुख्य परिमाण क्षेत्र (KRA) निश्चित केले होते.
सदर (KRA) मधील विविध निर्देशांकची पुढील वर्गवारी करून मूल्यांकन करण्यात आले.त्यामध्ये नागरी वित्त व प्रशासनातील मालमत्ता कराची वसुली, महसुली जमा व खर्च, आस्थापना खर्चाचे प्रमाण या बाबी पाहण्यात आल्या. त्याचप्रमाणे केंद्र पुरस्कृत योजेनेमधील स्वच्छ भारत मिशन, अमृत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, पी एम स्वनिधी यांची कामगिरी बघून मूल्यांकन करण्यात आले.
सदर निर्देशकांचे संबंधित माहितीच्या आधारे मूल्यांकन करण्याकरिता आयुक्त तथा संचालक,नगर पालिका प्रशासन संचालनालय यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय त्रिसदस्यी समिती गठीत करण्यात आली होती यामध्ये पुणे महानगरपालिकेला तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे.
20 एप्रिल या नगर विकास दिनाचे औचित्य साधून एनसिपी ए, मुंबई येथे झालेल्या भव्य संभारभा मध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन पुणे मनपाचे आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांचा गौरव करण्यात आला. या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर , राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक मुख्य सचिव भूषण गगराणी , प्रधान सचिव सोनिया सेठी , आयुक्त तथा संचालक किरण कुलकर्णी हे उपस्थित होते.


 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!