सर्रास विक्रेत्यांकडे जुने वजनकाटे, डिजीटल काट्यांना रामराम.

 पिंपरी, दि.२१ :- पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात छोट्या टेम्पोतून भोंगे लावून गल्लोगल्लीत भाजी विक्रीचा व्यवसाय जोरात चालू आहे. यामध्ये कांदा, बटाटा व लसूण विक्रेत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र ह्या विक्रेत्यांकडून मापात गोलमाल करून ग्राहकांची मोठी फसवणूक केली जात असल्याचा प्रकार नवी सांगवीत समोर येत आहे. अशा मापात पाप करणाऱ्या विक्रेत्यांविरूद्ध प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या मार्फत जुन्या वजनकाट्यांऐवजी डिजिटल वजन काटे वापरण्याच्या सूचना प्रशासनाकडून यापूर्वी वारंवार देण्यात आलेल्या आहेत तसेच डिजिटल वजन काटेही योग्य वजन दाखवतात का ? ते तपासण्याच्या ही सूचना प्रशासनाकडून विक्रेत्यांना करण्यात आलेल्या आहेत मात्र डिजिटल वजन काटे वापरणे तर सोडाच साधे वजन काटेही पुरातन काळाच्या पद्तीने शहरात वापरले जातात हे आश्चर्य! या वजन काट्यांवर वजनाऐवजी दगड मांडणे, एखादी वस्तू मांडणे असे प्रकार चालू असतात तर काही ठिकाणी त्याला लोहचुंबक लावून वजन काट्याच्या मापातच पाप केले जाते.
असाच एक प्रकार नवी सांगवीतील साई चौक ते फेमस चौक दरम्यान फिरत्या टेम्पो चालकाकडून केल्याचा पाहायला मिळाला यामध्ये त्याने वजनकाट्याखाली लावण्यासाठी ठेवलेले चुंबक ग्राहकाच्या निदर्शनास आले. त्यावर विचारना करताच संबंधित कांदा विक्रेत्याने उडवा उडवी चे उत्तरे देत असा गैरप्रकार करत नसल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात खातरजमा केली असता वजन काट्यात आतमध्ये चुंबक लावून हेराफेरी होत असल्याची बाब समोर आली.
मात्र या बाबीसाठी तक्रार करायची कुठे ? असा ग्राहकांकडे प्रश्न निर्माण होत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी येतात मात्र जर असे गैरप्रकार होत असतील तर त्याविरुद्ध तक्रार कशी व कोठे करायची ? त्याचीही सोय असावी असे ग्राहकांकडून बोलले जात आहे.
त्यासाठी प्रत्येक सोसायटीत, भाजी मंडई, दूकाने यातच तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक, वेबसाईट उपलब्ध असावी. असेही मत ग्राहकांकडून समोर येत आहे.

 

Advt-


 

 

Comments are closed

error: Content is protected !!