● मुलांना स्वतःच्या पायावर उभे करून आकाशाला गवसणी घालण्याचे बळ देणाऱ्या आईसाठी मुलाकडून अनोखी भेट.
● वयाच्या साठाव्या वर्षी आईने केली फ्लाईंग रायनो पॅरामोटर ची राईड.
पुणे,दि.२३ :- प्रत्येक मुलास आईसाठी काहीतरी अनोखे करण्याची धडपड असते. आपल्या जीवनात आपण उंच भरारी घ्यावी हे आईचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न साकारताना मुलांच्या शिक्षणासाठी आई वडील अनेक खस्ता खात असतात, दिवसरात्र अहोनात काबाडकष्ट करत असतात. आपल्या आईसही आनंदाचे क्षण मिळावेत या विचारातून प्रा.प्रशांत आबणे यांनी वयाच्या साठाव्या वर्षी आई सौ. शशिकला दीलिप आबणे यांना फ्लाईंग रायनो पॅरामोटर ची राईड घडवून आणत वाढदिवसाची अनोखी भेट दिली.
राहु ता.दौड येथील प्रा. प्रशांत आबणे हे नोकरी निमित्त पुण्यात असतात. त्यांनी आपल्या आईसाठी वाढदिवसानिमित्त अनोखी भेट द्यायची असल्याचा मानस कुटुंबातील सदस्यांना सांगितला त्यानुसार या अनोख्या भेटीचे आयोजन करून ते 21 मे रोजी जेजुरीतील कडेपठार परिसरातील फ्लाईंग रायनो पॅरामोटर राईड सेंटर येथे आले व संपूर्ण सुरक्षिततेची साधने वापरून त्यांनी आपल्या आईस हवाई सफर घडवून आणली. ही सफर घडवून आणत असताना त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही अत्यानंद झाला होता. तर वयाच्या साठाव्या वर्षीही सौ. शशिकला आबणे या न घाबरता साहसी वृत्तीने उंच राईड साठी तयार झाल्या.
आपल्या मुलांनी आपल्यासाठी केलेल्या अनोख्या भेटीने त्या भारावून गेल्या आनंद व्यक्त करताना त्या म्हणाल्या राईड दरम्यान संपुर्ण जेजुरी शहर, जेजुरी गड उंच आकाशातून पाहता मन भरून पाहता आला. विमान प्रवासाचा मुक्त आनंदही घेता आला. हा अनुभव अतिशय सुखद होता.
तर मुलगा प्रा.प्रशांत आबणे म्हणाले कि,प्रत्येक मुलाने आपल्या आईवडीलांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करून उतारवयात त्यांची काळजी घ्यायला हवी. कामाच्या व्यस्ततेतून आपल्या कुटुंबियांसाठी वेळ काढायला हवा. पृथ्वीवरील देव म्हणजेज आपले आईवडील असून त्यांची सेवाच सर्वात महत्वाची आहे.
Comments are closed