●एटीएम कार्ड साठी ग्राहक तब्बल एक वर्ष वेटींगवर.
● बँक म्हणतेय वरिष्ठ कार्यालयाकडून एटीएम कार्ड उपलब्ध होत नाहीत आली तर देवू.
पिंपळे गुरव, दि. २४ :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील महाराष्ट्र बँकेचा संथगतीचा कारभार पाहता ग्राहक पुरते हैराण झाले आहेत. पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया घोषणेनुसार आज कालच्या आधुनिक युगात ग्राहकांनाही बँकेत जाण्यापेक्षा ऑनलाईन बँकिंग द्वारे अथवा एटीएम द्वारे व्यवहार करण्यास सुलभ वाटते. मात्र पिंपळे गुरव येथील महाराष्ट्र बँकेचा कारभार पाहता ग्राहक वारंवार आपल्या बँकेत कशा चकरा मारतील हे पाहिले जाते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पिंपळे गुरव परिसरातील गणेश लोंढे नावाचे ग्राहक एक वर्षांपूर्वी एटीएम कार्ड हरवल्याची तक्रार घेऊन बँकेमध्ये गेले होते त्यावेळी त्यांची तक्रार नोंद करून ते एटीएम कार्ड ब्लॉक करण्यात आले होते व तुम्हाला दुसरे एटीएम कार्ड पोस्टाने घरी येईल असेही सांगण्यात आले. त्यानंतर एक दोन महिन्यानंतरही एटीएम कार्ड न मिळाल्याने आर्थिक देवाणघेवाण करताना उद्भवणाऱ्या अडचणींमुळे ते ग्राहक बँकेत चौकशी करण्याकरता पुन्हा गेले त्यावेळी आमच्या बँकांमध्ये चीप असलेल्या कार्डची कमतरता असल्याचे कारण तेथील बँक कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले व पुन्हा चौकशी करण्यास सांगण्यात आले.
त्यानुसार लोंढे हे कित्येक वेळा बँकेमध्ये गेले मात्र प्रत्येक वेळी एटीएम कार्ड उपलब्ध नाहीत असे कारण देऊन त्यांना परत पाठवण्यात आले त्यामुळे आजच्या आधुनिक युगातील बँकेची यंत्रणा ही कशी संथ पद्धतीने काम करत आहे व ग्राहकांना याचा कसा फटका बसत आहे याचा अंदाज येतो.
एकीकडे भारताचे पंतप्रधान डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्यास सांगतात तर दुसरीकडे बँक कर्मचारी व व्यवस्थापन यास कसे हरताळ फासते हे पहायला मिळते.
बँकेतील आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असलेले एटीएम कार्ड बँकेकडे उपलब्ध नाही तर ग्राहक डिजिटल पद्धतीचा वापर कसे करू शकणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण विविध ऑनलाईन बँकिंगचे एप्लीकेशन वापरताना एटीएम कार्ड वरील क्रमांक हा गरजेचा असतो तसेच एटीएम पिनही टाकावा लागतो मात्र इथे एटीएम कार्डच मिळत नसल्याने ग्राहकांनी करायचे काय असा सवाल उपस्थित होत आहे.
गणेश लोंढे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की मी वारंवार बँकेमध्ये चौकशीसाठी जाऊन थकलो आहे मला पैसे काढण्यासाठी एक तर रांगेत उभे राहावे लागते किंवा बाहेर बसलेल्या किंवा इतरत्र ठिकाणी असलेल्या एजंट कडून पैसे काढण्यासाठी कमिशन म्हणून अतिरिक्त पैसेही खर्च करत करावे लागतात आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना हा बँकेच्या नियोजनाच्या अभावाने विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे त्वरित हा प्रश्न बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन सोडवावा.
Comments are closed