पुणे, दि. २५ (punetoday9news):- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाकडून इ.१ली ते १२वी चा अभ्यासक्रम २५ टक्के कमी केल्याची माहिती देण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. याबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहिर केला आहे. 

“कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ. १ ली ते इ. १२ वी साठी सुमारे २५% पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली,” असे  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट केले आहे.

कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून राज्यातल्या सर्व  शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. दरवर्षी जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होते मात्र यावर्षी नेहमीप्रमाणे शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. वेळेवर शाळा सुरू न करता आल्यामुळे वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या समस्या लक्षात घेऊनन सीबीएसईनेदेखील अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे राज्य शासनानेही राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करायला मान्यता दिली आहे. कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी. तसेच याबाबत शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी आवश्यक प्रसिद्धी द्यावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे

कमी केलेला अभ्यासक्रम खालील संकेत स्थळावर उपलब्ध आहे…..

https://www.maa.ac.in/

Comments are closed

error: Content is protected !!