पिंपरी, प्रतिनिधी :
छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून छावा मराठा संघटनेच्यावतीने नागरिकांना सरबत वाटप आणि अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


छावा मराठा संघटनेचे अखिल छत्रपती शिवाजीनगरचे शहराध्यक्ष शुभम गवळी यांनी पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विनायक तंबी, विकी शिंदे, रोहित साळवे, राज मॅथ्यू, आयुष माठे, शुभम मोती, ओंकार शिरसाट, संतोष परब, संदीप वायदंडे, करण वाघेला, अनिकेत माने आदी उपस्थित होते.


संघटनेच्या वतीने आयोजित लाईट शो, साऊंड शो व लेजेर शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होते. रामभाऊ जाधव यावेळी बोलताना म्हणाले, की आजच्या युवकांनी व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आत्मसात करून मार्गक्रमण करणे, ही काळाची गरज आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!