सासवड:- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका , महिला शिक्षकांनी औक्षण करून तसेच पुष्पवृष्टी करून सुमधुर संगीतात स्वागत करण्यात आले.



यावेळी शाळेत सर्वत्र फुगे लावण्यात आले होते. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता.

इलेक्ट्रिक रिक्षांकरिता पुणे महापालिकेकडून मिळणार २५ हजार रुपये अनुदान

शासनाच्या नियमानुसार पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन मोफत पाठ्यपुस्तके वाटप केले, तसेच गोड खाऊ देण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

शेतकऱ्याचा नादच खूळा ; Thar ने केली नांगरट. 

अरे बापरे !! हरणाचा हा विडिओ तर भलताच व्हायरल.



 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!