नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वाऊ… आमि दहिवाचे दहिवाचे, दास पंढरीरायाचे…
टाळ वीणा घेऊनि हाती, केशवराज गाऊ किती…
ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत वैष्णवांच्या मेळ्याने रविवारी लोणंदनगरीत प्रवेश करताच संपूर्ण परिसर टाळ-मृदंग आणि माउली नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
सातशे वर्षांची अखंडपणे चालत आलेली वारीची परंपरा, विठुराया चरणी समर्पित करण्यासाठी वारकरी आळंदीहून पंढरीकडे निघाले आहेत. या वारीचा सातारा जिल्ह्यातील माउलींचा हा पहिला मुक्काम लोणंद येथे आहे. पालखी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पालखी तळावर विसावली आणि त्यानंतर मंगळवारी दुपारी माउलींच्या टाळ-मृदंगांचा निनाद अन् ज्ञानोबा माउली तुकारामाचा अखंड जयघोष करत माउलींच्या पालखीने तरडगाव कडे निघाली, चांदोबाचा लिंब येथे पाहिले उभे रिंगण पार पडले.
पाचशेहून अधिक छोट्या-मोठ्या दिंड्या या आनंद सोहळ्यात दाखल झाल्या आहेत. रथापुढे सत्तावीस दिंड्या, रथामागे दोनशे पंचवीस आणि तात्पुरते नंबर दिलेल्या सुमारे पाचशेहून अधिक दिंड्या आणि इतरही शेकडो दिंड्या वारीत सहभागी झाल्या आहेत. या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक संस्था आणि त्यांचे स्वयंसेवक पुढे येऊन ही सेवा करत असतात, यातीलच एक म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवार व चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट होय, आज लोणंद ते तरडगाव च्या दरम्यान वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्याचा उच्यांक झाल्याचे दिसून आले, तसेच वारकऱ्यांनी सेवा घेण्याकरिता लांबचलांब रांगा लागल्याचेही यावेळी दिसून आले.
या ट्रस्ट च्या माध्यमातून पुणे ते पंढरपूर या पालखी महामार्गावर वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्याच महान कार्य ही संस्था अनेक वर्षांपासून करत आहे. चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आमदार लक्ष्मण जगताप यांनी हे कार्य हाती घेतले . त्यांचे हे सेवा कार्य त्यांच्या परिवाराने पुढे चालू ठेवले असून ट्रस्ट चे अध्यक्ष शंकर जगताप आणि बंधू विजय जगताप हे लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या माध्यमातून करत आहेत. वरीमधील वारकऱ्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांच्या वतीने सर्व ती मदत केली जाते. डॉक्टरांच्या आणि चंद्ररंग पॅरामेडिकल कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अखंड पालखी सोहळ्याच्या मार्गावर ही आरोग्य सेवा उपलब्ध आहे, हजारो भक्त या आरोग्यसेवेचा लाभ घेताना या मार्गावर दिसत आहेत.
Comments are closed