पिंपळे गुरव,दि.२१ :- “जागतिक योग दिन २०२३” च्या निमित्ताने बुधवार दि. २१ जून रोजी, योगगुरू मेघा झणझणे आणि योगगुरू मीना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश सहकारी बँकचे संचालक अभय नरडवेकर, पोलिस खात्यातील योगेश ठोंबरे, भास्कर खोडदे, शेडगे यांच्या सहकार्याने सकाळी ७.३० ते ८.३० दरम्यान संपूर्ण योगपरिवाराने योगदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. जवळपास १०० साधकांनी ह्या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.
अरे बापरे !! हरणाचा हा विडिओ तर भलताच व्हायरल.
ह्या कार्यक्रमा दरम्यान योगगुरू मेघा झणझणे ह्यांनी विविध आसने सूर्यनमस्कार आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्व विस्तृतपणे सर्वांसमोर मांडले. दैनंदिन आयुष्यात योगामुळे काय काय बदल घडू शकतात. याचे त्यांनी सुरेख विवेचन केले.
उदयोजक गोंविद पाटील,
पिं.चिं. महानगरपालिका माजी चेअरमन सीमा सुकाळे, पिं. चिं महानगरपालिकेच्या शिक्षिका किर्ती भाडळे, नायब तहसीलदार अर्पणा देशपांडे, कवयित्री चंद्रकला ओव्हाळ, व्यावसायिका स्वरूपा आभाने, मोनिका महाडीक या योगसाधकांनी आपले वैयक्तिक अनुभव सगळ्यांसमोर मांडून इतरांनाही प्रेरित केले.
कार्यक्रम काटेपुरम हाऊसिंग सोसायटी, फेज १, काटे चौक येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
भरती : सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये कर्मचारी भरती ; १० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आरोग्य वारीच्या सेवाकार्याची परंपरा परिवाराकडून कायम.
शेतकऱ्याचा नादच खूळा ; Thar ने केली नांगरट.
Comments are closed