सांगवी,दि.२१ :- मनःशांती, आरोग्य आणि आनंदासाठी विद्यार्थ्यानी दररोज योग्य मार्गदर्शनाखाली योग अभ्यास करावा.आजच्या मोबाईलच्या दुनियेत एकाग्रता वाढवायची असेल व आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर रोज योग साधना केली पाहिजे असे मत आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. सौ .शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय सांगवी आयोजीत कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केले .
रोज मुलांनी व्यायाम केला पाहिजे असे ते म्हणाले शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी मुलांकडून योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली व त्यांचे महत्व मुलांना समजावून सांगितले .
भरती : सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये कर्मचारी भरती ; १० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.
या वेळी ओंकार, प्रार्थना, पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानधारणा, पदमासन, वज्रासन, तडासन, इ. आसने विद्यार्थ्यानी केली. एका वेळी एकूण ५८० विद्यार्थी , शिक्षक, पालक यांनी योगदानाची प्रात्यक्षिके केली. संस्थेचे सचिव तुळशीराम नवले कार्यक्रमाचे अध्यक्ष होतें.
शेतकऱ्याचा नादच खूळा ; Thar ने केली नांगरट.
या कार्यक्रमास सुनीता टेकवडे, हेमलता नवले, सीमा पाटील, मनिषा लाड, पांचशिला वाघमारे, शितल शितोळे, श्रद्धा जाधव, दिपाली झणझने, भाग्यश्री कोकाटे, संध्या पुरोहित, भारती घोरपडे, निर्मला भोईटे, कुसुम ढमाले, इ शिक्षक वर्ग पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे प्रस्ताविक दत्तात्रय जगताप यांनी केले व आभार स्वप्निल कदम यांनी मनाले. शाळेत योगदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
अरे बापरे !! हरणाचा हा विडिओ तर भलताच व्हायरल.
अकरावी ऑनलाईन प्रवेश संबंधित संपूर्ण माहिती विडिओ सहित.
Comments are closed