पिंपरी, प्रतिनिधी :
प्रा. संपत गर्जे लिखित ‘अभंगाची मूल्यगंगा’ व ‘सारांश लेखन एक कला’ या ग्रंथांचा प्रकाशन समारंभ येत्या रविवारी (दि.२५) सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला असून, हा समारंभ पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे होणार आहे.


‘सारांश लेखन एक कला’ या पुस्तकाचे प्रकाशन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्या हस्ते, तर ‘अभंगाची मूल्यगंगा’ या पुस्तकाचे प्रकाशन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद स्वामी महाराज व अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाल सबनीस असणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ बालभारतीचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, उद्योजक विजय जगताप, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, भारतीय जैन संघटनेचे शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प अधिकारी सुरेश साळुंके, एससीईआरटी’चे योगेश सोनवणे, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे विजय भदाणे, भारतीय जैन संघटना विद्यालय वाघोलीचे प्राचार्य संतोष भंडारी, भारतीय जैन संघटना विद्यालय पिंपरीचे प्राचार्य दिलीपकुमार देशमुख, भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालय पिंपरीचे मुख्याध्यापक संजय जाधव, माजी नगरसेविका आशाताई शेंडगे, मुखपृष्ठकार रेखाताई भदाणे, मुखपृष्ठकार अरविंद शेलार, परिस पब्लिकेशन्सचे प्रकाशक गिरीश भांडवलकर, पांडुरंग पवार, राजेंद्र कोकणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुस्तकाचे लेखक संपत गर्जे यांनी दिली.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव यंदा विविध उपक्रमांनी साजरा होणार.

दरम्यान, माजी मुख्याध्यापक स्व. माणिकराव गर्जे प्रतिष्ठानच्या वतीने विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये संत बहेणाबाई पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक सुरेखाताई कटारिया यांना, संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांना, संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रसिद्ध कवी ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांना, माजी मुख्याध्यापक स्व. माणिकराव गर्जे युवा रत्न पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते नितीन भिलारे यांना, माजी मुख्याध्यापक माणिकराव गर्जे प्रतिष्ठान आदर्श शिक्षिका पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षिका अनुराधाताई घुले यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. संपत गर्जे यांनी दिली.

 

भरती : सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये कर्मचारी भरती ; १० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.



इलेक्ट्रिक रिक्षांकरिता पुणे महापालिकेकडून मिळणार २५ हजार रुपये अनुदान

अरे बापरे !! हरणाचा हा विडिओ तर भलताच व्हायरल.

 

शेतकऱ्याचा नादच खूळा ; Thar ने केली नांगरट. 




#

Comments are closed

error: Content is protected !!