सांगवी :- पंढरीच्या पायी वारीचे औचित्य साधून आमच्या सांस्थेच्या शाखांच्या वतीने प्रबोधन पालखी होत आहे जणू काही वैष्णवांचा मेळा शितोळे शाळेत अवताला आहे आणि साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन झाल्याचा व वारीचा आनंद अनुभवायला मिळाला असे मत छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. सौ शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, शिशुविहार,नूतन माध्यमिक विद्यालय, मॉडर्न नर्सरी, श्रीमती सुंदरबाई भानसिंग हुजा गुरुगोविंद इंग्लिश मिडीयम स्कूल सांगवी आयोजीत प्रबोधन पालखी सोहळयात संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जंगले यांनी व्यक्त केले.

पाचवी, आठवी ; व्हायचय पास तर करावाच लागेल अभ्यास.

सर्व वारकरी व संत झालेल्या मुलांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले. या पालखी सोहळ्यात पाच दिंड्या कारण्यात आल्या होत्या व प्रत्येकाचा अनुक्रमे साक्षरता, आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण, स्वच्छ्ता अशी नावे देण्यात आली होती.

भरती : सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये कर्मचारी भरती ; १० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

यामध्ये कु. रेणुका चव्हाण ही वासुदेव झाली होती तिने समाजात जाऊन वरीला विषयावर माहीती सांगितली व संदेश दिला. विठ्ठल रुक्मिण, ज्ञानेश्र्वर, एकनाथ,तुकाराम, नामदेव, मीराबाई, मुक्ताबाई, इ. संतांची वेशभूषा विद्यार्थ्यानी केली होती. पालखी शितोळे शाळेपासून वेताळ महाराज सोसायटी, शिक्षक सोसायटी, बाळासाहेब शितोळे मार्केट, गजानन महाराज मंदीर, पी. डब्लू. डी रोड, शितोळे नगर, स्पयासर रोड वरून शाळेकडे मार्गस्थ झाली. मुलांना कल्याचा प्रसाद वाटून पालखीची सांगता करण्यात आली.


याप्रसंगी संस्थेचे सचिव तुळशीराम नवले, अखिल सांगवी ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रवींद्र निंबाळकर, सांगवी स्पोर्ट्स चे अध्यक्ष किशोर ठाकर, ज्ञानप्रभा क्लास चे सर्वेसर्वा ह.भ. प. प्रभाकर करळे महाराज, मुख्याध्यापक शिवाजीराव माने, मध्यामिक प्रमूख शितल शितोळे, इंग्रजी माध्यम प्रमूख शोभा वरठी, शिशुविहार प्रमुख संगिता सूर्यवंशी, सांगवी भजनी मंडळाचे सदस्य, ज्येष्ठ नागरीक संघाचे सदस्य, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव यंदा विविध उपक्रमांनी साजरा होणार.
हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व माध्यमांच्या शिक्षक, सेवकयांनी खुप परिश्रम घेतले.






पाचवी, आठवी ; व्हायचय पास तर करावाच लागेल अभ्यास.

 

#

Comments are closed

error: Content is protected !!