पुणे, पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आलाय. या घटनेने राज्यात खळबळ उडालीय. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील काळजाचा थरकाप उडवतात. पुण्यातील सदाशिव पेेठेतील ही घटना आहे. या युवतीनं प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने तिचा पाठलाग करून तिच्यावर कोयत्याने वार केले.
त्याचवेळी लेशपाल जवळगे या युवकाने हा प्रकार पाहिला आणि तातडीने युवतीच्या मदतीला धावला. त्याने हल्ला करणाऱ्या तरुणाला रोखले आणि चोप दिला. एवढंच नाही तर त्याने त्या हल्लेखोर तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान या हल्ल्यात ती तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या गंभीर घटनेवर आलेल्या प्रतिक्रिया.
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात आज सकाळी तरुणीवर हल्ला करण्यात आला. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या तरुणीला वाचवण्यात स्थानिक तरुण लेशपाल जवळगे याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि आरोपीला पोलीसांच्या ताब्यात दिले. लेशपालचे मनापासून आभार! शासनाने महिलांच्या सुरक्षेला…
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 27, 2023
लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या तरुणांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल त्यांचं मनापासून कौतुक!
या दोन तरुणांनी पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात कोयत्याच्या हल्ल्यातून एका तरुणीला वाचवण्याचे काम केले आहे. दर्शना पवार या तरुणीच्या हत्येच्या घटनेनंतर घडलेली ही आणखी एक घटना चिंताजनक असून… pic.twitter.com/0Q16OKXIHF
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) June 27, 2023
लेशपाल ,आज तुझ्यामुळे एक जीव वाचला ,तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे!!
आज पुण्यामध्ये कोयत्याने तरुणीवर हल्ला करण्याचा गंभीर प्रकार घडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत लेशपाल जवळगे या तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावून त्या पिडीत मुलीला हल्ल्यातून वाचवले. यावेळी गुन्हेगाराच्या हातातील… pic.twitter.com/mqRvEuiEUZ
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 27, 2023
Comments are closed