पुणे, दि.१ :-१. संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृह,

2.   1000 मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट 1,

३.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह गोल्फ क्लब येरवडा,

४.   मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह नवीन येरवडा गोल्फ क्लब,

५.   मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कोरेगाव पार्क, पुणे

येथील वसतिगृहात मुलांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहरातील विभागीय स्तरावरील शासकीय वसतिगृहात 2023-24 या कालावधीतील रिक्त जागेवर प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्रातील अनूसचित जाती, अनूसचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील इच्छुक इयत्ता 11 वी, प्रथम वर्ष व्यावसाईक, बिगर व्यावसाईक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज हा वसतिगृहात मोफत मिळणार आहे.

 

त्याच ठिकाणी बारकोडची देखील सुविधा करण्यात आलेली असून मोबाईलद्वारे स्कॅन करुन देखिल प्रवेश अर्ज मिळविता येणार आहे.

वसतिगृहांमध्ये मोफत राहण्याची, जेवण्याची, अभ्यासाची, खेळाच्या सुविधेसह दर महा निर्वाह भत्ता दिला जातो. प्रवेशासाठी गुणपत्रकाची प्रत, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते पासबुकाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे जोडावी. वरील पाच वसतिगृहांसाठी एकच अर्ज भरायचा आहे, असे संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी कळविले आहे.

 

 

 

 

 






क्लिक वर माहिती-

●  एक रुपयात पीक विमा; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

●  तलाठी भरती संपूर्ण माहिती व तयारी साठी विडिओ..

●  पाचवी, आठवी ; व्हायचय पास तर करावाच लागेल अभ्यास.

●  भरती : सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये कर्मचारी भरती ; १० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!