नवी सांगवी,दि.१ :- आजोबा विठोबा मलाही पाहायचांय.. मला पण सोबत यायचंय.. असा हट्ट धरलेल्या नातवाला.. ठिक आहे.. अजून तू लहान आहेस.. थोडा मोठा झालास की नक्की जाऊ आपण.. असे समजावत आजोबा व काका पायी वारीला निघून गेले. ते परतले ते पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेऊनच.
या वारीच्या काळात आजोबा व काकांपासून दुर राहिलेल्या नातवाने आजोबा घरी येताच कुटुंबासमवेत आजोबाची पाद्यपूजा केली.
पिंपळे गुरव, नवी सांगवीतील या आजोबा आणि नातवाच्या नात्याचं सध्या खूप कौतुक होत आहे. भारतीय संस्कृतीतील आजोबा नातवाच्या नात्यातील प्रेम व मैत्री यातून वारीच्या निमित्ताने दृढ होत आहे. येथील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत काशिनाथ महामुनी (वय ६६) व
मुलगा सुहास सूर्यकांत महामुनी (वय २८) यांनी पहिल्यांदाच पंढरपूर पायी वारी करण्यासाठी जायचा विचार केला. मात्र नातु समर्थ सचिन महामुनी वय (६ वर्षे) याला सोडून जाणे आजोबाला जमत नव्हते. मला ही घेऊन चला म्हणणाऱ्या नातवाची समजूत काढत आजोबांनी व काकांनी ही पायी वारी पूर्ण केली.
तु अजून थोडा मोठा झालास की, तुलाही घेऊन पायी वारी करणार या अटीवर आणि आजोबाची पायी वारी पूर्ण झाली. आषाढीला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आलेल्या आजोबाची नातवाने पाद्यपूजा करून आजोबांचे दर्शन घेतले. पुणे जिल्हा परिषद येथे बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेले सुर्यकांत महामुनी सेवा निवृत्तीनंतर व्यायामासाठी दररोज सकाळी दहा किलोमीटर परिसरात पायी फेरफटका मारून घरी परतत असत. तसेच सायंकाळी देखील दहा किलोमीटर पायी फिरून येत असत. हा त्यांचा नित्यक्रम पालखी सोहळ्यातील पायी दिंडी वारीत उपयोगी ठरला.
नोकरी सेवेत असताना तसेच नोकरी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सूर्यकांत महामुनी यांच्या मनात एकदा तरी पांडुरंगाची पायी वारी करण्याची ईच्छा होती. ती उराशी बाळगत यंदाच्या वारीत पुणे येथील एका दिंडीत सहभागी होऊन मनातील ईच्छा पूर्ण केली. घरी परतल्यावर वारीतील येणारे अनुभव कुटुंबियां संमवेत व्यक्त केले.
पंढरीत पोहचल्यानंतर रांगेत उभे राहून दर्शनासाठी २२ तास लागतील असे समजल्यावर मी व मुलाने विठ्ठलाचे मुखदर्शन घेण्याचे ठरविले. थोडी माझी उंची कमी असल्यामुळे मुखदर्शन होत नव्हते. मुलगा दोन वेळा म्हणाला दिसले का माऊली यावेळी मी म्हणालो नाही अजून. खूपच मुख दर्शनासाठी गर्दी होती. अचानक मला गर्दीत कुणी तरी उचलले आणि म्हणाले दिसले का विठ्ठल. मी हो म्हणालो आणि मला खाली उतरविले. ज्यांनी उचलून दर्शन घडविले त्यांना बघे पर्यंत ते गायब झाले.
– सुर्यकांत महामुनी, आजोबा
पुण्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश अर्ज सुरू.
एक रुपयात पीक विमा; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
तलाठी भरती संपूर्ण माहिती व तयारी साठी विडिओ..
Comments are closed