स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे, दि. ५ :- पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरामधील अन्नधान्य वितरण कार्यालयाअंतर्गत ११ परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात २५ रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सत्ता नाट्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या गटातून पिंपरी, चिंचवड, भोसरी व शिरूर मतदार संघ आता कुणाचा असेल?
रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://pune.gov.in वर उपलब्ध आहे. या ठिकाणी सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधित परिमंडळ कार्यालयात याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.
तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत; मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी कळविले आहे.
एक रुपयात पीक विमा; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पुण्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश अर्ज सुरू.
सत्ता नाट्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या गटातून पिंपरी, चिंचवड, भोसरी व शिरूर मतदार संघ आता कुणाचा असेल?
Comments are closed