● विठ्ठल, दैवत भाषणात,तर पदावरून हटवण्याची तजवीज निवडणूक आयोगात. 

● निवडणूक आयोगाकडेही पक्ष व चिन्हासाठी मागणी.

● सत्ता नाट्य भाग 2 म्हणत जनतेची या राजकीय घडामोडींकडे पाठ.

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर आता धक्कादायक बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण या शपथविधीच्या दोन दिवस आधीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी शपथविधीआधी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांच्या मिळून एकूण 40 जणांच्या स्वाक्षऱ्याही आहेत.

रेशन दुकान सुरू करण्याची संधी ; याठिकाणी करावा लागेल अर्ज.  अधिक माहितीसाठी. वाचा…

अजित पवार यांनी शपथविधीच्या आधी आपण विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांनी पूर्ण पक्षावरच दावा केल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

पुण्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश अर्ज सुरू.

अजित पवार यांनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिकाही दाखल केली आहे. राष्ट्रवादीच्या 40 आमदार आणि खासदारांनी मिळून ठराव तयार केला. या ठरावात अजित पवार यांचा दावा योग्य असल्याचं म्हटलं आहे. हा ठराव देखील याचिकेसोबत जोडण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय. दुसरीकडे अजित पवार यांनी आज आमदारांची बैठक बोलावली होती. त्यांच्या आजच्या बैठकीला विधानसभेचे 32 आमदार उपस्थित होते. या सर्व आमदारांना आता एकत्र ठेवण्यात आलं आहे.

एक रुपयात पीक विमा; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अजित पवार यांच्याकडून 30 जूनला एक याचिका तयार करण्यात आली होती. ही याचिका केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज निवडणूक आयोगाला मिळाली आहे. 40 सदस्यांचा पाठिंबा असल्याचं या याचिकेत स्पष्टपणे म्हटलं आहे. तसेच अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत, असं या याचिकेत म्हटलं आहे.

तलाठी भरती संपूर्ण माहिती व तयारी साठी विडिओ..

सत्ता नाट्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या गटातून पिंपरी, चिंचवड, भोसरी व शिरूर मतदार संघ आता कुणाचा असेल?

दरम्यान, निवडणूक आयोगाला एक वेगळा ई-मेलही मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा मेल पाठवला आहे. या मेलमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, प्रकरण सध्या वादग्रस्त आहे. कुठलाही एकपक्षीय आदेश जारी केला जाणार नाही. अपात्रतेची कारवाई आमच्याकडून सुरु करण्यात आली आहे. आपण दोन्ही बाजूची भूमिका ऐकून निर्णय घ्यावा, असं मेलमध्ये म्हटल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

 







 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!