सांगवी,दि.५ :- कासारवाडी येथील श्री साई कुंज दत्त आश्रमात चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट व लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने देहू – आळंदी ते पंढरपूर वारीत आरोग्य सेवा पुरविणाऱ्या आरोग्य सेवेक-यांचा सत्कार करण्यात आला.

पासवर्ड विसरलात? चिंता नको पासवर्ड शोधण्याची सोपी ट्रिक.

तलाठी भरती संपूर्ण माहिती व तयारी साठी विडिओ..

चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दिंडीतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविली जाते.तशीच मोफत आरोग्यसेवा याही वर्षी पुरवण्यात आली. यात वारकऱ्यांना मोफत तपासणी व औषधोपचार देहू आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण पालखी महामार्गावर पुरविण्यात आले.यात दररोज हजारो वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला.

कासारवाडी येथील श्री साई सेवा कुंज आश्रमात वारीतील आरोग्य सेवेक-यांचा सत्कार करण्यात आला.

यात सेवेचे योगदान देणारे डॉ. संतोष कदम, डॉ.ऋषी महाजन, डॉ.देविदास शेलार, डॉ. प्रियांका बाजड,चंद्ररंग पॅरामेडिकलचे संतोष चव्हाण,अदिती शिंदे ,रेखा आडे,समृद्धी चव्हाण,यश मोरे, अजित शिंदे, आदी आरोग्य सेवेक-यांचा विठ्ठल रुक्मिणी मुर्ती शाल श्रीफळ देऊन चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पांडुरंगाच्या वारकऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आले हा वसा पुढे निरंतर सुरू ठेवणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष शंकर जगताप बंधू विजय जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, दत्त आश्रमाचे शिवानंद स्वामी महाराज, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शंकर जगताप, सुभाष दादा काटे, जयश्रीताई जगताप, मीनाताई काटे, विजू अण्णा जगताप, प्रकाश भाऊ काटे, उद्योजक विजय जगताप, ह. भ. प.बब्रुवाहन महाराज वाघ, बाळासाहेब करंजुले, अरुण अण्णा काटे, रमेश काशिद , उद्धव कवडे , सखाराम रेडेकर सुनील कोकाटे आदी उपस्थित होते. यात आरोग्य सेवेकरी डॉ.देविदास शेलार,डॉ.ऋषी महाजन, डॉ.सारंग शेलार, डॉ.प्रियंका बाजड,अदिती शिंदे ,रेखा आडे,समृद्धी चव्हाण,संतोष चव्हाण,यश मोरे, अजित शिंदे, आदी आरोग्य सेवेक-यांचा विठ्ठल रुक्मिणी मुर्ती शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!