पिंपरी: (प्रतिनिधी)
पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक शहरात देखील एक ‘कराओके शो’ यशस्वी करुन दाखवण्याचे स्वप्न रमाकांत तुंगारे आणि अतुल क्षीरसागर यांनी व त्यांच्या एम बी म्युझिक ग्रुपने पाहिले; जे ‘वन्स मोअर’ या जल्लोषात पूर्ण देखील झाले.एम बी म्युझिक ग्रुप आणि आपलं पिंपरी चिंचवड प्रस्तुत जी टेक कॉम्प्युटर एज्युकेशन यांच्या सहयोगाने आयोजित स्वरमिलाप या संगीत मैफलीतून रसिकांनी संगीताचा सुवर्णकाळ अनुभवला.

अजरामर गीतांचे गीतकार साहीर लुधियानवी, हसरत जयपुरी, आनंद बक्षी, गुलझार, शैलेंद्र,जावेद अख्तर, मजरूह सुल्तानपुरी, शिवकुमार शर्मा, शांताराम नांदगावकर, सचिन पिळगावकर यांच्या गीतांतून चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ जिवंत झाला.

मा. नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या संकल्पनेतून मागील वर्षीच्या गणेशोत्सव मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रावेत गॉट टॅलेंट या स्पर्धेतून मिळालेले गायक यांना एकत्रित करून चित्रपट संगीताच्या सादरीकरणातून रसिकांना आनंद देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या एम बी म्युझिक ग्रुपच्या माध्यमातून स्वरमिलाप या हिंदी आणि मराठी गाण्याचा कार्यक्रम निगडी प्राधिकारणातील ग दि माडगूळकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


यावेळी मा नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री भोंडवे,मा विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, संत तुकाराम सह साखर कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ,कामगार नेते हेमंत कोयते,उद्योजक राजकुमार कोंडे,उद्योजक आर एस देशिंगे, जी टेक कॉम्प्युटर एज्युकेशन चे रोहन भुर्के,डॉ राजेंद्र चिकटे आदी सह रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

विविध संकल्पनांवर आधारित गाण्यांचे सादरीकरण हे या मैफलीचे वैशिष्ट्य होते. एखादे गाणे खूप गाजले की नेहमी त्या गाण्याचा चित्रपट, अभिनेता, अभिनेत्री, संगीतकार, गायक यांचीच चर्चा होते; पण गीताला जन्म देणाऱ्या गीतकाराचा उल्लेख होतच नाही. ही खंत आहे, त्यामुळे कार्यक्रमात प्रत्येक गाण्याच्या सादरीकरणाआधी गीतकाराची माहिती, रंजक किस्से सांगण्यात आले.


कार्यक्रमाची सुरूवात ‘सत्यम शिवम सुंदरम…’ या गाण्याने झाली. मेरे नैना सावन भादो,चुरा लिया है,कभी जो बादल बरसे,पुकारता चला हू मै,तुने ओ रंगिले,तुम ही हो,रिम झिम गिरे सावन,अगर तुम मिल जाओ,चोरीचा मामला,रिम झिम के गित सावन,ये राते ये मौसम, एक लडकी भिगी भागी सी, बाबूजी धिरे चलना,दिल क्या करे जब किसीं को,दिल तो पागल है,मुसकुराने की वजा तुम हो,गारवा,वाजले की बारा,दिल है की मानता नही,तुझ मे रब दिखता है यारा,ये मेरा दिल प्यार का दिवाना,चंद्रा,ए मेरी जोहरा जबी,मेरी रशकी कमर,आच्छा तो हम चलते है अशा एका हून एक सरस किशोर कुमार,महंमद रफी,लता मंगेशकर, आशा भोसले,अरजित सिंग,अनुराधा पौडवाल,मिलिंद इंगळे,रुपकुमार राठोड,श्रेया घोषाल आदी गायकांनी गायलेल्या गीतांचा आनंद रसिकांनी लुटला. संस्कार अवटी याने दोन्ही आवाजात गायलेल्या ए राते ए मौसम या गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

उमा क्षीरसागर, अमिता जाधव,अनुराधा वाघमारे, प्रियंकापवार,गौतम तुंगारे,अनिल पासवान,संस्कार अवटी,गोपीनाथ कलाल या गायकांनी जणू काही आपलाआत्मा प्रत्येक गाण्याला अर्पिला आहे अन् त्याच्या हृदयातील निरागसता प्रत्येक गाण्यात अवतरली आहे असा भास होत होता. गाण्याच्या स्वरलहरी संपूर्ण प्रेक्षागृहात वाहून आपल्यातली ओजमयता खुल्या हाताने देत होत्या. ही ऊर्जा या स्वरांच्या मार्फत रसिक प्रेक्षकांच्या मनी झळकत होती. स्वरांच्या परावर्तित होणाऱ्या प्रकाशमान लहरी आनंद उधळत होत्या. यातच एका पेक्षा एक अशा विविध गाण्यांच्या नादाने वातावरण तरंग मय झाले आणि नाट्यगृह दुमदुमले. संगीत संध्येचा शेवट आन मिलो सजना या चित्रपटातील अच्छा तो हम चलते है या गीताने झाला.पवित्र अशा मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याची सुरवात लवकरच होणार आहे त्याचे औचित्य साधून
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित प्रत्येक रसिकांना कृष्ण तुळस एम बी म्युझिक ग्रुपच्या वतीने भेट देण्यात आली. निवेदन अतुल क्षीरसागर यांनी केले.
——
शहरातील विविध नाट्यगृहात कार्यक्रमाचे सादरीकरण करा.
गायक रसिकांसमोर गातो आपली कला सादर करतो. त्यांचे कौशल्य हे सादरीकरणाद्वारे हजारो नागरिक पाहत असतात, अनुभवत असतात. या नवोदित गायकांनी देखील आता आपली कला लोकांपर्यंत पोहोचवायला हवी. केवळ छोट्या सभागृहात गीतांचे सादरीकरण करणे आज पुरेसे नसून येत्या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शहरातील विविध मोठ्या नाट्यगृहात सादरीकरणासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन शिक्षण मंडळाचे मा सभापती आणि संत तुकाराम सह साखर कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ यांनी केले.
——
सर्वोत्कृष्ट कार्यक्रम.
पिंपरी-चिंचवडकरांची सांस्कृतिक भूक भागविण्या बरोबरच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी प्राधिकरणामध्ये माझ्या प्रयत्नातून सुजज्ज असे नाट्यगृह उभारले आहे.नाट्यगृहाला आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांचे नाव देण्यात आले. स्थानिक कलाकारांसाठी उभारलेल्या नाट्यगृहात अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांना मेजवानी मिळत आहे.स्वरमिलाप या कार्यक्रमात सर्वच गायकांनी सादर केलेल्या विविध गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करीत कार्यक्रम वेगळ्या उंचीवर घेऊन गेले आहेत.आज पर्यंत येथे सादर झालेल्या गितांच्या कार्यक्रमातील हा एक सर्वोत्कृष्ट कार्यक्रम ठरला असे प्रतिपादन मा विरोधीपक्षनेते राजू मिसाळ यांनी केले.
—-
शहरात नावलौकिक मिळवतील.
स्थानिक कलाकारांना एम बी म्युझिक ग्रुपच्या माध्यमातून निर्माण केलेल्या व्यासपीठा वरून सादर झालेली सर्वच गाणी अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारी होती.सर्वच गायकांनी आपली कला अंतर मनातून सादर केली त्यामुळे येथून पुढे सुद्धा एम बी म्युझिक ग्रुपच्या माध्यमातून सादर होणारे कार्यक्रम शहरात नावलौकिक मिळवतील असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या जयश्री भोंडवे यांनी व्यक्त केला.

 


 

 

 

 

 







 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!