नवी दिल्ली, २६ जुलै (punetoday9news):- श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) चे अध्यक्ष म्हणून सौरव गांगुली यांचे समर्थन करताना असे म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) क्रिकेट बाबत कुशाग्र बुद्धी असल्याने प्रशासक म्हणून या भूमिकेसाठी एक ‘योग्य’ दावेदार वाटतो .
संगकारा म्हणाला कि “मला वाटते सौरव गांगुली बदल घडवून आणू शकेल. मी दादा (गांगुली) चा एक मोठा चाहता आहे, तो केवळ क्रिकेटपटू म्हणूनच नाही तर मला वाटते की त्याच्याकडे क्रिकेटची कुशाग्र बुद्धी आहे. ” तसेच क्रिकेट प्रशासक मंडळामध्ये प्रभावी पदासाठी महत्त्वपूर्ण असणारे संबंध निर्माण करण्याची क्षमता गांगुलीकडे आहे. बीसीसीआय अध्यक्ष होण्यापूर्वीच मी त्याचे कार्य पाहिले आहे, प्रशासन आणि कोचिंग करण्यापूर्वी, जगभरातील खेळाडूंशी चांगले संबंध निर्माण केले. गांगुलीने अलीकडेच म्हटले आहे की आयसीसी पदाबाबत आपली कोणतीही घाई नाही.
Comments are closed