नितीन चिलवंत यांची शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सदस्यपदी नियुक्ती 

पिंपरी, प्रतिनिधी :

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम नियोजनासाठी गठीत झालेल्या समितीत मराठवाडा जनविकास संघाचे सदस्य नितीन चिलवंत यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पार्टीचे महापालिकेतील माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार व मराठवाडा जनविकास महाराष्ट्र राज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या हस्ते नितीन चिलवंत यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल लोंढे ही उपस्थित होते.

नितीन चिलवंत मराठवाडा मुक्तीसंग्राम लढयातील स्वातंत्र्यसैनिकाचे नातू आहेत. तसेच मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या कार्यात नेहमी अग्रेसर आहेत. त्यांनी दोन संकल्प केले असून, पिंपरी-चिंचवड व आळंदी येथे कार्यक्रमांचे आयोजन करून आळंदी येथील इंद्रायणी घाटावर ७५ हजार दीप व समई लावून मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव साजरा करणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडावासिय, ज्येष्ठ नागरिक, युवक युवती, स्वातंत्र्य सेनानी यांच्या हस्ते तिरंगा ध्वजवंदन करून 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
हे दोन्ही संकल्प चांगले असून, याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन एकनाथ पवार व अरुण पवार यांनी दिले.

 


 

 

 

 

 

 

 




 




 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!