पिंपरी , २७ जुलै(punetoday9news) :- ऑनलाईन चोरीचा नवा प्लॅन पिंपरी चिंचवड मध्ये उघड झालाय .यामध्ये सायबर चोर हे तुमचे सिम कार्ड एक दिवसासाठी बंद केलं जाणार आहे असे सांगून तुमच्या सिम कार्ड चे अधिकार तुमच्याकडे घेतात . ग्राहकांना यासाठी तुमचे सिम कार्ड अपडेट होणार असल्याचे सांगितले जाते . अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड मधील या तरुणाला १३ लाखांना गंडवण्यात आले आहे . आपली सिम कार्ड अपडेटच्या बहाण्याने फसवणूक झाली आहे कळेपर्यंत बराच तोटा झालेला होता .
दीपक सूर्यवंशी ४७ वर्षीय फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ६ मे २०२० ला एका मोबाईलवरून सूर्यवंशी यांना फोन आला व आयडिया कस्टमर केअर मधून बोलत असून तुमचे सिम कार्ड फोर-जी मध्ये अपडेट न केल्यास बंद होईल असे सांगण्यात आले . मग त्याने अधिकची माहिती घेत १९ अंकी सिम नंबर त्याच्या नंबर वरून सूर्यवंशी यांना पाठवला. नंतर आयडिया कस्टमर केअर १२३४५ नंबर पाठवून, त्यावर नंबरवर तो नंबर एसएमएस करायला सांगितले. लॉकडाऊनमध्ये घर बसल्या काम होत आहे म्हणून सूर्यवंशींनी तो नंबर पाठवला. तुमचे सिमकार्ड अपडेट करायचे आहे का? असा आयडिया कडून मेसेज आल्याने सुर्यवंशीना विश्वास बसला. त्यांनी पुढची प्रक्रिया ही पार पाडली. ६ मे ला हे सिमकार्ड बंद झाले ते ७ मे च्या दुपारी ३ पर्यंत सुरू होईल, असे आयडिया कडून सांगण्यात आले . पण सिम कार्ड सुरू झाले नव्हते. म्हणून सूर्यवंशींनी त्या नंबरवर पुन्हा एकदा केला असता. तुमचेच काम चालू असून एका तासाने पूर्ण होईल असे उत्तर मिळाले व त्यानंतर तो फोन स्विच ऑफ करण्यात आला .
त्यामुळे शंका आल्याने, कारण तोच नंबर बँकेच्या खात्याशी जोडलेला आहे. खात्यात तीन लाखांहून अधिकची रक्कम ही आहे. म्हणून नेट बँकिंगद्वारे ते तपासण्याचा प्रयत्न केला तर बँक खाते उघडले नाही. म्हणून ७ मे च्या रात्रीच सूर्यवंशींनी बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. तेव्हा बँक खात्यावर दहा लाखाचे पर्सनल लोन घेतल्याचे आणि त्यासह आधीचे तीन लाख असे तेरा लाख इतर खात्यात ट्रान्स्फर केल्याची माहिती मिळाली . मग त्यांच्या लक्षात आलं की तो एकोणीस नंबर त्याच्याकडे असणाऱ्या फोर जी सिमकार्डचे होते, त्यामुळे नंबरचे ऍक्सेस त्याच्याकडे गेले. लॉकडाऊनमुळं गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला असून चिखली पोलीस गुन्ह्यासंबंधी तपस करत आहेत.
Comments are closed