पुणे,दि.२०:- आज सकाळी १०.२० वा. अनेकांच्या मोबाईलवर एक धोक्याचा इशारा देणारा इमर्जन्सी अलर्ट मेसेज आला असेल. त्यानंतर १०.३२ वाजता पुन्हा एकदा मेजेस आला. एकाचवेळी सर्वांच्या मोबाईलवर एकच मेसेज आल्याने ग्रामीण व शहरी नागरिकांत प्रचंड घबराहट उडालेली दिसली.
हा कोणता स्कॅम तर नाही ना? आपला मोबाईल हॅक तर झाला नाही ना? मेजेसवर क्लिक केले तर मोबाईलचा स्फोट तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडले. मात्र जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर घाबरुन जावून नका.
पासवर्ड विसरलात? चिंता नको पासवर्ड शोधण्याची सोपी ट्रिक.
देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. हा मेसेज म्हणजे, सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची यावेळी चाचणी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.
सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने, १०.३२ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. यामुळे प्रचंड संशयकल्लोळ निर्माण झाला होता. विशेषत: ग्रामीण भागात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. अजूनही नागरिकांमध्ये त्या मेसेजबद्दल भीतीचे वातरावरण आहे. मात्र आज तुम्हाला आलेला अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे काळजीचे कोणतेही कारण नाही.
ट्रॅफिक नियम मोडलात ? दंडात्मक मेसेज मोबाईलवर आला नाही तर अशी तपासा दंडाची रक्कम.
Comments are closed