पिंपरी, दि. २७(punetoday9news):- वाढत्या कोरोना प्रादुर्भाव व रक्तपेढीत असलेली कमतरता या प्राश्वभूमीवर पिंपरी चिंचवड मधील सांगवी परिसर महेश मंडळतर्फे २१ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्ताचा तुटवडा भागवण्यासाठी कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करीत पिंपळे सौदागर येथील शिवम सोसायटी मध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले .
रक्तदान शिबिरात ४७ रक्तदात्यानी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. रक्तसंकलनसाठी आचार्य आनंदऋषी पुणे रक्तपेढ़ीने सहकार्य केले. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या नगरसेविका निर्मला कुटे (सभापती महिला बालकल्याण समिती ) राम बांगड , संदीप भोळे, सतीश लोहिया आदी उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल, पंकज टावरी , संजय मुंदडा ,मनोज आरमरकर यांनी सहकार्य केले.
जाहिरात:-
.
Comments are closed