पिंपरी, दि.२४ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये करण्यात येते.
कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका ठेवणार – नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी जाहीर
जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. यामध्ये पावसाच्या साठलेल्या पाण्याचे नियोजन करावे, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे, शहरपरिसरात वेळोवेळी किटकफवारणी करण्यात यावी, बसथाब्यांचे नुतनीकरण करण्यात यावे, खराब झालेल्या ड्रेनेज लाईन्स दुरूस्त करण्यात याव्यात अशा तक्रारींचा प्रामुख्याने समावेश होता.
महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाचे स्थलांतर झाले असल्याने नवीन प्रभाग इमारतीत पहिलीच जनसंवाद सभा पार पडली, त्यासही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेकडून दिल्या गेल्या आहेत.
Comments are closed