छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची मागणी
पिंपरी, प्रतिनिधी :
मेट्रोच्या कामानिमित्त गेल्या चार वर्षापासून बंद असलेला मुंबई पुणे जुना महामार्ग बोपडी ते खडकी स्टेशन दरम्यान एकेरी करण्यात आला आहे. परिणामी बोपोडी ते खडकी बाजार रस्त्यावरील वाहतूक एकेरी करण्यात आली. त्यामुळे शाळकरी मुले, वाहनचालक, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. आता मेट्रोचे काम पूर्ण झाले असूनही रस्ता का बंद ठेवण्यात आला आहे, असा सवाल छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केला आहे.
कोरोनाच्या अगोदरपासून येथील मेट्रोचे काम सुरू करण्यात आले होते. गेली चार वर्ष हे काम सुरू आहे. त्यामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील बोपोडी ते खडकी स्टेशन दरम्यान वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. ही वाहतूक खडकी बाजार मार्गे वळवण्यात आली. त्यामुळे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना मिलिटरी हद्दीतून आरे चौकात येऊन पुढे शिवाजीनगरला जावे लागत आहे. दरम्यान, ही वाहतूक शाळांच्या समोरून जात असल्याने शाळकरी मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या वाहतुकीमुळे शाळा, महाविद्यालये सुटण्याच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होते.
JOB : फ्रेशर्स वेब डेव्हलपर्ससाठी सुवर्णसंधी.
परिणामी खडकी बाजारकडून बोपोडीकडे येणारा रस्ता एकेरी करण्यात आला आहे. त्यामुळे खडकी बाजारकडून बोपोडी, दापोडीकडे येताना नागरिकांना वळसा घालून खडकी स्टेशन मार्गे बोपोडीत यावे लागत आहे. त्यामध्ये अनेकदा वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. आता शाळा सुरू झाल्याने वाहतूक कोंडीत विद्यार्थी, पालक अडकून पडत आहेत.
पालखी सोहळ्यापूर्वी हा रस्ता खुला करण्याचे आश्वासन मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, पालखी सोहळा होऊन महिना उलटूनही अद्याप रस्ता सुरू करण्यात आलेला नाही. तिथे सिमेंटचे पाईप आडवे लावण्यात आले आहेत. रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे तर रस्ता का बंद ठेवण्यात आला आहे ? याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, पालकांना बसत आहे. ही वाहतूक खडकीतील अनेक शाळांच्या समोरून जात असल्याने शाळकरी मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा प्रशासनाने अंत पाहू नये.
– रामभाऊ जाधव, पुणे जिल्हाप्रमुख, छावा मराठा संघटना
किल्ले पन्हाळगड ते धारातीर्थ पावनखिंड: अविस्मरणीय अनुभव – विक्रम कदम
JOB : फ्रेशर्स वेब डेव्हलपर्ससाठी सुवर्णसंधी.
कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका ठेवणार – नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी जाहीर
पासवर्ड विसरलात? चिंता नको पासवर्ड शोधण्याची सोपी ट्रिक.
Comments are closed