पिंपरी, प्रतिनिधी :
कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आकुर्डीतील सामाजिक कार्यकर्ते मनजीत खालसा यांना गेल्या 13 वर्षांपासून द्रास, कारगील येथे भारतीय सैन्य दलाच्या वतीने निमंत्रित करण्यात येते. यंदाही त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. कारगिल विजय दिनाच्या पूर्वसंध्येला दीप प्रज्वलीत करून, तसेच बुधवारी सकाळी पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी कारगिल युद्धातील शहीद जवानांना आदरांजली वाहिली. 


बुधवारी सकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान, वायूसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, सेना प्रमुख जनरल मनोज पांडे, भारतीय नौसेना प्रमुख ऍडमिरल आर. हरि कुमार यांच्या उपस्थितीत कार्यक्रलालाही मनजीत खालसा उपस्थित होते.

JOB : फ्रेशर्स वेब डेव्हलपर्ससाठी सुवर्णसंधी.

मोबाईल, रिक्षा चोरी उघड ; देहुरोड पोलिसांकडून मूळ मालकांना आवाहन. 

सामाजिक कार्यकर्ते मनजीत खालसा हे चार दिवसापूर्वीच द्रास, कारगील येथे कारगिल दिन कार्यक्रमासाठी रवाना झाले होते. त्यांना भारतीय सैन्य दलाकडून खास निमंत्रण देण्यात आले होते. आज प्रमुख पाहुण्यांसोबत त्यांनाही कारगील विजय दिनाच्या कार्यक्रमाचा साक्षीदार होता आले. शहीद जवानांबद्दल आदर आणि संवेदना व्यक्त करणे हा माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.
या गौरवबद्दल बोलताना मनजीत खालसा यांनी सांगितले, की देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण करून आपली देशभक्ती जागृत करण्यासाठी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. भारतीय सैन्याचे देशप्रेम, स्वयंशिस्त, श्रद्धा, शारीरिक व मानसिक सामर्थ्य, तसेच वीरवृत्ती उल्लेखनीय असते आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण देशहितासाठी कार्य करणे आवश्यक आहे. सैनिकांनी केलेल्या त्यागाबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. या क्षणाचा साक्षीदार होणं, हे माझ्या दृष्टीने महत्त्वचा क्षण आहे. मला निमंत्रित केल्याबद्दल आपण भारतीय जवानांना सलाम करतो.
———————-

मला सांगायला अभिमान वाटतो की, गेली 13 वर्षे मी द्रास, कारगिल येथे भारतीय सैन्यासोबत कारगिल दिवस साजरा करत आहे. इतकी वर्षे मला निमंत्रित केल्याबद्दल मी भारतीय सैन्याला सलाम करतो आणि नतमस्तक होतो. सर्व शहीद जवानांबद्दल आदर आणि संवेदना व्यक्त करणे हा सन्मान आहे.
– मनजीत खालसा, समाजसेवक

 


 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!