पिंपळे गुरव, दि.२९ :-  पिंपळे गुरव येथे राहणारी आर्या गारडे हिने अकरावी मुलींची सब जुनियर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा नागपूर येथे २२ ते २६ जुलै या दरम्यान झालेल्या स्पर्धेमध्ये ३४ ते ३७ वजनी गटात विजय मिळवल्याने नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा ३ ते ११ सप्टेंबर रोजी आसाम येथे होणार आहे.

 ‘आभा’ कार्डसाठी अशी करा नोंदणी.

मोबाईल, रिक्षा चोरी उघड ; देहुरोड पोलिसांकडून मूळ मालकांना आवाहन. 
लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन या क्लबचे मुख्य मार्गदर्शक राहुल पाटील व संदीप धनगर यांनी तिचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

आर्या गराडे हिला मिळालेल्या यशाबद्दल पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शंकर जगताप, उद्योजक माऊली जगताप यांनी शाल व  पुस्तक देऊन तिचा सन्मान केला.

यावेळी शंकर जगताप म्हणाले की “आर्या गारडे ही प्रत्येक स्पर्धेसाठी खूप मेहनत घेताना दिसत आहे त्यामुळेच ती प्रत्येक स्पर्धेत विजयी होत नॅशनल स्पर्धेपर्यंत पोहोचली आहे तिने नॅशनल स्पर्धा जिंकून ऑलम्पिक पर्यंत जाऊन पिंपरी चिंचवड शहराचे नाव सुवर्ण अक्षरात लिहावे.”

त्यावेळी उद्योजक मिलिंद कंक,सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे, संदीप दरेकर, प्रमोद ठाकर, साई कोंढरे,सुनील देवकर आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

बापरे !!! तलाठ्याने पैसे चक्क चावून खाल्ले.

किल्ले पन्हाळगड ते धारातीर्थ पावनखिंड: अविस्मरणीय अनुभव – विक्रम कदम

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!