पिंपरी दि .२७ ( punetoday9news) :- पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे अत्यंत भयंकर व धक्कादायक अशी घटना घडली आहे. स्वतःची ४ वर्षाची मुलगी त्रास देते म्हणून एका महिलेनं आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली. या घटनेमुळं पुण्यात खळबळ उडाली आहे.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी त्रास देते या कारणावरून तिच्या आईनं पोटच्या चार वर्षांच्या मुलीचा भिंतीवर डोके आपटून आणि मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. सासूच्या दशक्रिया विधीसाठी कुटुंबीय बाहेर गेले असताना पिंपरी-चिंचवडमधील भालेकर नगर, पिंपळे गुरव परिसरात ही हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना सोमवारी (२७ जुलै) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. सविता दीपक काकडे (वय २२, रा. भालेकर नगर, पिंपळे गुरव, सांगवी) या निर्दयी मातेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर रिया दीपक काकडे (वय ४) असं मृत मुलीचं नाव आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे .

Comments are closed

error: Content is protected !!