एका सिनेमाच्या ऑडिओ लाँचच्या कार्यक्रमात रजनीकांत यांनी हे वक्तव्य केलं आहे. दारू पिणं ही माझी चूक, अशी जाहीर कबुली त्यांनी दिली आहे. मला दारूचे व्यसन नसते तर मी सजामासाठी आणखी चांगले काम केले असते. करिअरकडे लक्ष दिलं असते. दारू पिणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. दारू पूर्णपणे सोडा असं माझं म्हणणं नाही. पण नियमित मद्यपान करु नका. दारू तुमचा आनंद आणि आरोग्य खराब करु शकते, असं म्हणत रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांना मद्यपान न करण्याचा सल्ला दिला आहे.
बारामती ते केदारनाथ अन तेही सायकलवर.
‘आभा’ कार्डसाठी अशी करा नोंदणी.
रजनीकांत यांनी दारूच्या व्यसनाबाबत आधीही वक्तव्य केले होते. जानेवारीमध्ये तामिळ नाटकाच्या एका कार्यक्रमादरम्यान ते प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत होते तेव्हा ते बोलत होते. अभिनेता होण्याआधी मी कंडक्टर होतो तेव्हा रोज दारू प्यायचो. सिगरेटदेखील ओढायचो. दिवसातून दोन वेळा मांसाहार करायचो. पण माझी पत्नी लताने तिच्या प्रेमाने माझ्यात बदल घडवून आणला. तिने मला एक सामान्य व शिस्तबद्ध आयुष्य जगण्याची सवय लावली, असं म्हणत रजनीकांत यांनी पत्नी लताचे आभार मानले आहेत.
दारू, सिगरेट आणि अती मांसाहार या तीन गोष्टींची जे अति सेवन करतात त्या व्यक्ती वयाच्या साठीनंतर निरोगी आयुष्य जगू शकत नाहीत, असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.
मोबाईल, रिक्षा चोरी उघड ; देहुरोड पोलिसांकडून मूळ मालकांना आवाहन.
किल्ले पन्हाळगड ते धारातीर्थ पावनखिंड: अविस्मरणीय अनुभव – विक्रम कदम
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक सूरू.
JOB : फ्रेशर्स वेब डेव्हलपर्ससाठी सुवर्णसंधी.
कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका ठेवणार – नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास
Comments are closed