सांगवी ,दि.१ :-  साहित्य रत्न लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती आज सांगवी गावात मातंग एकता आंदोलन शाखा सांगवी यांच्यावतीने साजरी करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.

गोल्डन स्टार डान्स स्टुडिओत जीएनडी ग्रुपकडून एकल नृत्य स्पर्धा संपन्न. 

प्रथमत: दीप प्रज्वलन करून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन उद्योगपती सावळेराम भोर व कामगार नेते विश्वनाथ नाना शिंदे यांनी केले . ह.भ.प बब्रुवान वाघ महाराज , ह.भ.प नारायण भागवत व ह.भ.प बाळासाहेब शितोळे महाराज यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

मातंग एकता आंदोलन पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष कुंदन शेषराव कसबे यांनी मान्यवरांचे स्वागत केले
ह.भ.प बब्रुवान वाघ महाराज ह.भ.प नारायण भागवत महाराज व कामगार नेते विश्वनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
सदर कार्यक्रमास प्रताप बगाडे, शिवाजी शिंदे, दिलीप अवघडे, राजेश खुडे, विजय पोळ, आप्पासाहेब कुंजीर, रेवाडी पोखरकर, अक्षय नलावडे, नरेंद्र कसबे, विजय देवरे आदी उपस्थित होते
आभार शैलेंद्र कसबे यांनी मानले.

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 






 

 

Comments are closed

error: Content is protected !!