नवी दिल्ली,दि.२७ (punetoday9news) :- बहुचर्चित राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीत पाच विमाने सोमवारी फ्रान्सहून भारत रवाना झाली आहेत. ही विमाने बुधवारी अंबाला हवाई दल स्थानकात पोहोचतील . हवाई दलासाठी ३६ राफेल विमान खरेदी करण्यासाठी भारताने चार वर्षांपूर्वी फ्रान्सबरोबर ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला होता.
हवाई दलाच्या ताफ्यात राफेलचा समावेश झाल्याने त्यांची लढाऊ क्षमता लक्षणीय वाढणार आहे. पूर्व लडाखमधील सीमाप्रश्नावर चीनबरोबर गतिरोध सुरू असताना भारताला हे लढाऊ विमान अशा वेळी मिळाल्याने चीन साठी हि प्रतीकात्मक धोक्याची घंटा मानली जात आहे . फ्रान्समधील भारताचे राजदूत जावेद अशरफ यांनी ही विमाने फ्रान्समधून उड्डाण घेण्यापूर्वी भारतीय हवाई दलाच्या पायलटांशी चर्चा केली. पॅरिसमधील भारतीय दूतावासाने ट्वीट केले आहे की, “चांगली यात्रा घ्या: फ्रान्समधील भारतीय राजदूतांनी राफेलशी संवाद साधला आणि भारतीय वैमानिकांचे अभिनंदन केले.” त्यांनी या सर्वांना सुखरुप भारतात पोहोचण्याची शुभेच्छा दिल्या.
बुधवारी दुपारी या पाच लढाऊ विमानांना हवाई दलात समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. तसेच हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांना सैन्यात समाविष्ट करण्याचा औपचारिक समारंभ ऑगस्ट मध्ये आयोजित केला जाऊ शकतो
Comments are closed