सांगवी, दि.१ :- पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवीतील साई चौक येथील महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट मध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उत्साहात साजरी करण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट मध्ये दर वर्षी सर्व भाजी विक्रेते व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन विविध महापुरुषांची जयंती साजरी करतात. या जयंती बरोबर समाज उपयोगी व समाज प्रबोधनात्मक काम करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींचा मान सन्मान करतात.

यावर्षी राजीव गांधी नगर पिंपळे गुरव येथे एका व्यक्तीचे संदेश विलास थोरात व आदित्य संजय कांबळे या मुलांनी प्राथमिक उपचार करून प्राण वाचवले. यांच्या या धाडसी कार्याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले.

त्याप्रसंगी बोलताना भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपण या दोन तरुणांचा जो मान सन्मान केला.त्यांनी केलेली ही कामागिरी खरच खूप कौतुकास्पद आहे आज समाजात प्राण घेणारे दिसतात पण एखाद्याचे प्राण वाचवणे खूप कठीण गोष्ट आहे. या तरुणांनी केलेल्या कार्याचा सन्मान झाला पाहिजे यातूनच इतर तरुणांना प्रेरणा मिळेल.

याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे, विलास थोरात, हेमंत बाराथे, नितीन कुचेकर, कुणाल धिवार, रमेश डफळ, गणेश मते, अंकुश आपेट, भरत प्रसात, खंडेराव हल्लाले, सयाजी आगलावे, गणेश पैठणी, नितीन दोधाड, वैभव काळे, अरुण जाधव, बपीराम भोंगे, मनोज शिंदे, नवीन खान, एजास शहा, किरण वाणी, विपुल शिंदे, अंजना शिंदे, नंदा जाधव आदी भाजी विक्रेते व मान्यवर उपस्थित होते.

 ‘आभा’ कार्डसाठी अशी करा नोंदणी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.

मला दारूचे व्यसन नसते तर ; रजनीकांत यांनी बोलून दाखवली आयुष्यातील मोठी खंत

बारामती ते केदारनाथ अन तेही सायकलवर.

 

 

 

 

 

 






 

#

Comments are closed

error: Content is protected !!