पिंपरी, दि.३ :- पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे की आज दि. 03 रोजी पवना धरण 92.27% टक्के क्षमतेने भरले आहे. तरी विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये सकाळी 11:00 वाजता 1400 क्यूसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या 24 ते 48 तासांमध्ये पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.

तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे पवना धरण पूरनियंत्रण कक्ष कडून सांगण्यात आले आहे.

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!