पुन्हा ४७ चिनी ॲपला दणका .
नवी दिल्ली,दि. २७ (punetoaday9news) चीनच्या आणखी ४७ ॲपवर सरकारने बंदी घातली आहे. आतापर्यंत चीनच्या एकूण १०६ मोबाइल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, हे ऐप देशाच्या सार्वभौमत्वासाठी, ऐक्य आणि सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे कारण सांगण्यात आले आहे . मात्र एक धोकादायक बाब समोर आली आहे कि या पूर्वी बंदी घातलेल्या ॲप प्रमाणे काही साम्य असलेली ॲप उपलब्ध आहेत .
शुक्रवारी याबाबत आदेश जारी करण्यात आले आहे . ज्या ॲपवर बंदी घातली आहे त्यांची यादी उपलब्ध झालेली नाही. २९ जून रोजी सरकारने चीनच्या ५९ ॲपवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
Comments are closed