पिंपरी, दि.४ :-   भाजपकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात समन्वयक नेमले आहेत. या प्रक्रियेत भाजप आमदार महेश लांडगे यांना धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात समन्वयक भाजपने नेमले आहेत. पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. तर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्याकडे दिली होती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडे होती मात्र आता ती जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

त्यामुळे हा महेश लांडगे यांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. राजेश पांडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भाजपमध्ये आले आहेत. ते अभविपचे प्रदेशाध्यक्ष होते. आता ते भाजपचे उपाध्यक्ष आहेत.

मला दारूचे व्यसन नसते तर ; रजनीकांत यांनी बोलून दाखवली आयुष्यातील मोठी खंत

 ‘आभा’ कार्डसाठी अशी करा नोंदणी.

पासवर्ड विसरलात? चिंता नको पासवर्ड शोधण्याची सोपी ट्रिक.


 






 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!