नवी सांगवी,दि.५ :- महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समिती व देवांग कोष्टी समाज आयोजित ‘राष्ट्रीय विणकर दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा करिता महाराष्ट्र राज्यातून तसेच बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात विणकर बांधव याप्रसंगी एकवटला होता.
समाजातील साळी, कोष्टी, पद्मशाळी, यांची एकजूट मोठ्या प्रमाणात दिसून आली. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी ओबीसी संघटना तसेच एसबीसी आरक्षण विषयी मंत्री छगन भुजबळ यांनी मोलाचे मार्गदर्शन करून एसबीसी व ओबीसी मधील सर्व घटक एकत्र येऊन आपली संख्या दाखवून मोठ्या प्रमाणात शासनाला जागृत करण्याचे आव्हान केले. तसेच भविष्यामध्ये विणकर समाजाकरिता स्वतंत्र आर्थिक महामंडळासाठी मदत करण्याचे याप्रसंगी आश्वासन दिले.
या कार्यक्रमाकरिता संयोजक सुरेश तावरे यांनी प्रस्तावना करून आरक्षण बचाव संदर्भात माहिती दिली. तसेच समाजातील यशस्वी उद्योजक व अधिकारी यांचा सन्मान व सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान गोडसे, पंडित ढवळे व दत्तात्र ढगे यांनी केले. प्रमुख उपस्थितीमध्ये हिरालाल पगडाल संगमनेर यांनी एसबीसी चळवळ व आत्तापर्यंतच्या कार्याची भूमिका स्पष्ट केली. मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने मदत केल्याचे सांगितले. प्राध्यापक शिवाजी मोहाळे लातूर यांनी देखील आपल्या भाषणात आरक्षण बचाव करण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी विणकर सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील मेटे, चंद्रकांत अतिगीडद, विटा यांत्रमाग संघटनाचे अध्यक्ष किरण तारळेकर, विश्वनाथ मुसळे, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, संगमनेर कोष्टी मंडळाचे कार्यकर्ते उमेश ढोले, शशांक खोजे चौंडेश्वरी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन संजय कांबळे, विलास पाडळे, इचलकरंजी देवांग कोष्टी कला परिवाराचे अध्यक्ष व सर्व सदस्य, चौंडेश्वरी महिला बचत गट, शाकंभरी महिला बचत गट, बनशंकरी महिला बचत गटातील सर्व महिला, पुणे मेटाग्राफचे उद्योगपती अशोक मुसळे, उद्योगपती उत्तमराव म्हेत्रे, शीतल चोथे, उत्तम चोथे, सुरेश म्हेत्रे, प्रशांत सपाटे, प्रमोद मुसळे, मोहन सातपुते, उद्योजक नंदकिशोर मुसळे, महेश आव्हाड, शैलेश सातपुते, उंटवाले सांगलीकर, सुनील ढगे, सुनील डहाके, डॉ. अविनाश सांगोलेकर, डॉ. रत्नाकर धुत्रे, देवांग कोष्टी समाजातील सर्व कार्यकारिणी सदस्य, महिला मंडळ आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमाकरिता इचलकरंजी, विटा, सांगली, मुंबई, ठाणे, बीड, जालना, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, परभणी, पुणे, पिंपरी, चिंचवड, सोलापूर, वडगाव आदी भागातून बहुसंख्येने विणकर समाज मान्यवर उपस्थित राहून समाजाची एकी दिसून आली. कार्यक्रमाच्या शेवटी दत्तात्रय ढगे यांनी उपस्थित विणकर बांधवांचे अभिवादन करून आभार मानले.
Comments are closed