जेजुरी, दि.२७ ( punetoday9news):-
पुणे जिल्ह्यातील जेजुरी शहारत कोरोना पेशंटची संख्या सातत्याने वाढत होती. जनता कर्फ्यू व जिल्ह्यात लागु झालेला लाॅकडाऊन मिळून २० दिवस शहर बंद होते.त्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. २८ पासून जेजुरी शहरात नियम, अटी पाळुन सर्व व्यवहार सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जेजुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पूनम कदम यांनी दिली आहे .
विभागीय प्रांत आधिकारी यांच्या आदेशा नुसार हे लॉकडाऊन नियम अटी पाळुन दि २८ पासून शिथिल करण्यात आले आहे. त्यानुसार जेजुरीतील प्रतिबंधित क्षेत्रात स. ९ ते दु.१ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील तर उर्वरित भागात सर्व दुकाने स. ९ ते सा. ६ वा. पर्यन्त सुरु राहतील. दूध विक्री स. ७ ते रा.७ पर्यंत , हॉटेल्स व इतर पार्सल सेवा सकाळ ९ ते रा. ९ या वेळेत सुरु राहतील. यानुसार लाॅकडाऊन च्या नियमांचे पालन करत व्यवहार चालू राहतील.
व्यायामासाठी पहाटे ५ ते ७ ( सायकलचा वापर करावा) असे सूचित करण्यात आले आहे . दुकानदारांनी कामगारांना ओळखपत्रे द्यावीत, मास्क, सॅनिटायजर , सामाजिक अंतर याचे पालन करावे. केश कर्तनालय व तत्सम हे केंद्र सरकारच्या नियामाप्रमाणे सुरु राहतील . लग्न सोहळा व अंत्यविधी या प्रसंगी केवळ २० व्यक्ती सामाजिक अंतर व सुरक्षा साधनाचा वापर करून एकत्रित येऊ शकतील .मद्य विक्री दुकानात केवळ पाच व्यक्ती एकत्र येऊ शकतील . तसेच अत्यावश्यक सेवा वगळता शनिवारी सर्व व्यवहार बंद राहतील असे मुख्याधिकारी पूनम कदम यांनी सांगितले .
कोरोनाचा धोका अजून संपला नाही त्यामुळे नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी केले आहे .
जाहिरात:-
.
.
Comments are closed