● 56 पुस्तकांचं लेखन आणि संपादन.

● वैज्ञानिक विचारधारेला महत्व देणारं व्यक्तिमत्व.

● विविध समित्यांवर कार्य.

● ठोस वैचारिक भुमिका हे त्यांच वैशिष्ट्य. 

पुणे, दि.९ :-  महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी रामचंद्र नरके यांचं निधन झालं आहे. मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांच्या निधनाने समता चळवळीचा आघाडीचा शिलेदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

मराठीतील एक प्रसिद्ध लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि त्याचबरोबर मराठी ब्लॉगर अशी हरी नरके यांची ओळख राहिली. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक राहिले. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, त्यांचं कार्य सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोवण्यात हरी नरके यांचा मोठा वाटा राहिला.

सध्याच्या काळात फेसबुकवर,ट्विटरवर लिहिण्याचा ओघ वाढला आहे. अशात या आधुनिक प्लॅटफॉर्मवरही हरी नरके लिहिते झाले. त्यांचे ब्लॉग आणि फेसबुकवरील लिखान म्हणजे तरूणांसाठीचं ‘ऑनलाईन’ विद्यापीठ होतं. आता या विद्यापीठातील ज्ञानाचा वाहता झरा थांबल्याची भावना तरुणाई व्यक्त करत आहे.

याच आठवड्यात हरी नरके यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. मात्र त्या आधीच त्यांची प्राण ज्योत मालवल्याने पुण्यातील साहित्य आणि डाव्या चळवळींच्या वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,

 

खासदार सुप्रिया सुळे म्हणतात.

 

शरद पवार म्हणाले,

 






#

Comments are closed

error: Content is protected !!