पिंपरी, दि.१०:-  स्केल्स अँड टेल्स वाईल्डलाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशन,पुणे. ह्या संस्थेमार्फत मागील 10 दिवसांमध्ये 3 मोठ्या कासवांना वाचवण्यात आले.

गहुंजे,मावळ येथील लोढा बेलमोंडो सोसायटी आणि साळुंब्रे,मावळ येथून रेस्क्यू करण्यात आलेल्या दोन्ही मोठ्या आकारच्या दुर्मिळ लिथीस कासवांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आणि तिसरे कासाव हे कासारसाई – पाचाणे,तालूका – मावळ येथील एका शेतकरी कुटुंबाच्या मालकीच्या शेतामध्ये जखमी अवस्थेत आढळले आणि त्या जखमी कासवाला स्केल्स अँड टेल्स संस्थेच्या सदस्यांनी सुखरूपपणे ताब्यात घेऊन उपचारांसाठी पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट येथे पाठवले आहे.

 

ह्या तिन्ही घटना नदी आणि पाण्याच्या मोठ्या स्रोतांजवळ घडल्या आहेत. पावसाळ्याच्या दरम्यान कासवे नदीलगत असलेली शेती आणि मानवी वस्तीमध्ये येतात काही वेळा अंडी देण्यासाठी तर काही वेळा पावसामुळे वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून लहान कासवे बाहेर येतात.
वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार कोणतेही भारतीय प्रजातीचे कासव आपण घरात पाळू शकत नाही,पकडू शकत नाही किंवा शिकार करू शकत नाही आणि असे कृत्य केल्यास वनविभागतर्फे गंभीर गुन्हा दाखल होऊन शिक्षा होऊ शकतो.
वाढत्या शहरीकरणामुळे आज कासवाच्या कित्येक प्रजाती ह्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत अशा घटनाकडे दुर्लक्ष न करता एक जागरूक नागरिक म्हणून 1926 ह्या क्रमांकावर संपर्क करून वनविभागाला घटनेची माहिती देणे हे महत्वाचे आणि गरजेचे आहे.


 

 

 






 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!