खडकी, दि. २७( punetoday9news) गणेश कांबळे.
पिंपरी चिंचवड मधील लोकमान्य दवाखान्याचे डॉक्टर श्रीकृष्ण गंगाधर जोशी यांना दि १८ रोजी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून २५ लाखाची खंडणी मागण्यात आली. यात मी चंद्रकांत पाटील यांच्या पुणे कार्यालयातून त्यांचा पी. ए सावंत बोलत आहे. कोरोना महामारीमुळे गरीब जनतेची बिकट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर २५ लाख रुपये चंद्रकांत पाटील यांच्या पार्वती कार्यालयात पाठवून द्यावेत व नाही पाठवले तर जीवे मारण्यात येईल. अशी धमकी आरोपींनी दिली.
डॉ. जोशी यांनी निगडी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. ज्या मोबाईलचा नंबर वरून फोन केला होता. त्या मोबाईलचा पोलिसांनी एस. डी. आर. / सी. डी. आर. टॉवर्सचे लोकेशन शोधून पोलीसांची एक टीम तयार करून आरोपी सौरभ संतोष अष्टुळ. (वय २१ वर्ष, राहणारं लोहियानगर गंजपेठ, पुणे.) विशाल अरुण शेंडगे (राहणार कोंढवा.) किरण धन्यकुमार शिंदे (वय २५ वर्ष, राहणार लोहियानगर गंजपेठ पुणे.) यास दि. २२ जुलै रोजी रात्री अलंकार चौक पुणे येथून अटक करण्यात आली.
अरुण शेंडगे राहणार लोहियानगर, सध्या कोंढवा. याच्या विरुद्ध १). किथरूड पोलीस स्टेशन गु. र. नंबर ३८७/१४, १९३७/२०२०. २). समर्थ पोलीस स्टेशन गु. र. नंबर ११०/२०१४, ३). कोंढवा पोलीस स्टेशन गु. र. नंबर ३६४/२०१४. ४). पौड पोलीस स्टेशन येथे आमदार,चंद्रकांत पाटील, आमदार बाबर, आमदार विनायक निम्हण यांच्या नावाने खंडणी घेऊन अनेक श्रीमंत व्यक्तींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या तिन्ही आरोपींवर भा. दंड. संहिता कलाम ३८७, ५०१, आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, पो हवालदार मछिंद्र घनवट, पो हवालदार सतीश ढोले, विलास कोकणे, सुनील जाधव करीत आहे.
Comments are closed