पिंपरी, दि.१४ :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी सांगवी येथे आयोजित महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१५ ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी येथील नागरिकांसाठी नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स मंगल कार्यालय येथे महाआरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये साडेतीनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच साडेतीन हजारांहून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी, नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी महापौर प्रभाकर वाघिरे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, सुषमाताई तनपुरे, चंदाताई लोखंडे, स्वीकृत सदस्य सागर कोकणे, शिवाजी पाडूळे, माजी कार्याध्यक्ष युवक काँग्रेस शाम जगताप, युवा नेते सागर परदेशी, तानाजी जवळकर, विष्णू शेळके, वृक्षमित्र अरुण पवार, पवन साळुंके, शीतलताई शितोळे, तृप्तीताई जवळकर, इंद्रायणीताई देवकर, सतीश चोरमले, शुभम वाल्हेकर, चंद्रकांत तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व ग्रामस्थांच्यावतीने मानाचा फेटा बांधून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पांडुरंगाची मूर्ती भेट वस्तू देऊन विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
महा आरोग्य शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दातांचे उपचार, हृदयरोग तपासणी, कॅन्सर शस्त्रक्रिया उपचार व तपासणी, जनरल शस्त्रक्रिया, मणक्याचे विकार, शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दातदुखी, रूट कॅनल दाता संबंधीचे सर्व उपचाराबाबत मार्गदर्शन, ओपन हार्ट सर्जरी, लहान मुलांचे ओपन हार्ट सर्जरी, लहान मुलांचे हृदयाचे होल, वॉल बदलणे, एन्जोप्लास्टी, तोंडाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर, जनांद्रियांचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, लंग कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, घशाचा कॅन्सर, किडनी, लिव्हर व्यापी, कॅन्सरच्या समस्या आदी तपासणी करण्यात आली. तसेच मुतखडा मूत्राशयांचे कर्करोग, लहान मुलांच्या लघवीचे आजार, किडनी संबंधित सर्व आजार, स्लिप डिस्क, मणक्याचे ट्युमर्स, मान व पाठ दुखीचे औषधाद्वारे व लागल्यास ऑपरेशन द्वारे उपचार अशा अनेक इत्यादी आजाराने पीडित रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करून तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.
Comments are closed