● व्याख्यान व चित्रप्रदर्शनातून फाळणीच्या वेदनांचे स्मरण

पिंपरी,दि.१५ :-

भारताची फाळणी झाली त्यावेळी द्वेषाचा उसळलेला आगडोंब, लाखो लोकांना सोसाव्या लागलेल्या मरणयातना. त्यातून अनेकांना फक्त अंगावरच्या कपड्यानिशी स्वत:चे सोडावे लागलेले घरदार. उपासमारीपासून ते झालेल्या अनेक हल्ल्यात होरपळून निघालेले अखंड भारतातील लाखो लोक. तो भयान काळ व्याख्यानातून ऐकूण, चित्रप्रदर्शनातून पाहून अनेकांचे हृदय गहिवरुन आले, डोळे भरुन आले. या दिवसाचे स्मरण करुन देशातील एकोपा वाढावा, देश अधिकाधिक मजबूत व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.

विभाजन विभिषीका म्हणजेच फाळणी वेदना दिनानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या उपक्रमावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर ढोरे, संजय मराठे, दिलीप तनपुरे, सोनाली शिंपी, संतोष ढोरे, हिरेन सोनवणे, युवराज ढोरे, आप्पा ठाकर, जवाहर ढोरे, मंदाकिनी तनपुरे, दर्शना कुंभारकर, सारिका भंडलकर, सचिन थोरवे, कमलाकर जाधव, संदीप तांबे तसेच जेष्ठ नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगवी, चिंचवड गाव, पिंपरी कॅम्प, वाल्हेकर वाडी, लोकमान्य टिळक चौक, निगडी आदी शहरातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मूक पदयात्रा, फाळणीवेळच्या परिस्थितीची दाहकता स्पष्ट करणार्‍या फोटोंचे प्रदर्शन, व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात उत्तमजी दंडीमे यांनी आपल्या वक्तृत्वाने फाळणीचा काळ, त्याची दाहकता मांडली. त्याने सारेच हेलावून गेले.

 

 


 

 

 

 

 






#

Comments are closed

error: Content is protected !!