पिंपरी, प्रतिनिधी :
पवित्र माती, भारतीय स्वातंत्र्य, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मा यांना मानवंदना देण्यासाठी देशाच्या कानकोपऱ्यातून आणलेल्या पवित्र मातीच्या मंगल कलशांचे पूजन शास्त्रोक्त पद्धतीने शिवछत्रपती वनश्री पुरस्काराने सन्मानित वृक्षमित्र अरूण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराणा प्रताप उद्यान, निगडी येथे राजपूत समाज संगठन संस्था व मराठवाडा जनविकास संघ यांच्यावतीने ‘माझी माती, माझा देश’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात येथे महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास महापालिकेचे फ प्रभाग अधिकारी सिताराम बहुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व महिलांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली.
या मंगल कलशांमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ जन्मभूमी सिंदखेडराजा, छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी शिवनेरी, महाराणा प्रतापसिंह जन्मभूमी कुंम्भलगढ, महात्मा बसवेश्वर महाराज कर्मभुमी बसव कल्याण, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळ श्रीक्षेत्र आळंदी, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज जन्मभूमी श्रीक्षेत्र देहुगाव, साईबाबा जन्मभूमी पाथरी (पार्थपुर), भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जन्मभूमी करमसद, मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ जन्मभूमी सिंदगी, मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ समाधीस्थळ हैदराबाद आदी ठिकाणच्या पवित्र माती मंगल कलशांचा समावेश होता.
अरुण पवार यावेळी बोलताना म्हणाले, की या देशाच्या मातीत त्याग, बलिदान, समर्पन, स्वाभिमान, शौर्य व पराक्रमी विचारांची दैवी शक्ती आहे. जो मातृभूमीच्या मातीशी एकनिष्ठ होवून एकरूप झाला त्याने जगाच्या इतिहासात अजरामर स्थान मिळविले व जो बेईमान झाला तो त्याच मातीतून काळाच्या पडद्याआड गेला. म्हणून आपल्या मातीचे वंदन करून तिचे महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे.
यावेळी बीएसएफचे माजी अधिकारी विद्यमान नार्को टेस्ट अधिकारी पुणे मेजर मोहनसिंह निंबा गिरासे, पिं.चिं. महापालिकेचे माजी कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, राजपूत समाज संगठन संस्थेचे शहराध्यक्ष शिवकुमारसिंह बैस, महिला शहराध्यक्षा अश्विनी राजपूत, पवित्र माती मंगल कलशचे संकल्पक नितीन चिलवंत, भरत पाटील, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, सचिन काळभोर, नामदेवराव पाटील, महानुभाव पंथाचे शहर संघटक सुरेश तळेकर, उद्योजक नेताजी सिंह, जितेंद्र राजपूत, शैलेंद्र राजपूत, पृथ्वीराज इंगळे, सौ. गिरासे, दया इंगळे, मराठवाडा महिला मंच अध्यक्षा रेश्मा चिलवंत, आराधना बायस, मुकेश राजपूत, ॲड. श्रीराम परदेशी, अशोक इंगळे, नारायण चंदेल, गणेशसिंह राजपूत, सागरसिंह बघेल, महेंद्र गिरासे, रूपेश राजपूत, दिनेश गिरासे, सुनिल पाटील, रविंद्र कच्छवे, लक्ष्मण चव्हाण, लक्ष्मण कुलकर्णी, अमोल लोंढे, जितेंद्र पाटील, संतोष राजपूत, गणेश गहेरवार, ऋषी राजपूत, मल्हार बायस, सोपान राजपूत, नामदेव पवार, विनोद जाधव, परमेश्वर सोळंकी, प्रा. डॉ. प्रविण घटे, रामेश्वर इंगळे, विधी बैस, शौर्य चिलवंत, ईश्वरी राजपूत, दिव्यांश राजपूत, देवांश राजपूत आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन नितीन चिलवंत यांनी, तर आभार शिवकुमारसिंह बैस यांनी मानले.
‘आभा’ कार्डसाठी अशी करा नोंदणी.
पासवर्ड विसरलात? चिंता नको पासवर्ड शोधण्याची सोपी ट्रिक.
Comments are closed