पुणे, दि . २८ ( ) – यंदा कोरोना मुळे दहावीचा निकाल लांबला असला होता मात्र आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे . महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे . शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हि ट्विटर द्वारे याची माहिती दिली आहे . बुधवारी २ ९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येईल . मंडळाकडून पुणे , नागपूर , औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , अमरावती , नाशिक , लातूर , कोकण अशा नऊ विभागात मार्च २०२० मध्ये १० वीची परीक्षा घेण्यात आली होती .
विद्यार्थी आपला दहावीचा निकाल इथे पाहू शकतात .

www mahresult.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे .

 

विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रती साठी ३० जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे . असे राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे .

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!